बातम्या

  1. मुख्यपृष्ठ
  2. ताजी बातमी

शोकसभा

दिनांक 16 -1- 25 रोजी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक, सार्वजनिक वाचनालय नाशिक, व शुयमा ब्राह्मण संस्था या तिन्ही संस्थेच्या वतीने कै. उदयकुमार मुंगी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सभा संध्याकाळी पाच वाजता अखिल मध्यवर्ती ब्राह्मण संस्था नाशिक यांच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. सभेचे सूत्रसंचालन अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे कार्यवाह श्री अनिल देशपांडे यांनी केले.याप्रसंगी बोलतांना सार्वजनिक वाचनालय नाशिक चे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके म्हणाले की उदय कुमार मुंगीं सारखा जिगरबाज आणि स्पष्टवक्ता निर्भिड स्वभावाचा तळमळीचा उमदा कार्यकर्ता जाण्याने सावाना आणि ब्राम्हण समाजाचे मोठे नुकसान झाले. तसेच महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी म्हणाले की खरा कार्यकर्ता सत्तेपासून नेहमीच वंचित राहतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे उदयकुमार मुंगी. श्रद्धांजली अर्पण करताना विजय साने म्हणाले उदयकुमार मुंगी असा लढवय्या कार्यकर्ता आपल्यातून जाणे म्हणजे भाजपची आणि नाशिकच्या समाज जीवनाची हानी होय. गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष आणि शुयमा ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष श्री सतीश शुक्ल श्रद्धांजली अर्पण करताना म्हणाले की ब्राह्मण समाजाला संघटित करणारा दुवा आज हरपला. सुरवातीला महर्षी गौतम वेदविद्या प्रतिष्ठानच्या वैदिकांनी वैदोक्त मंत्रांनी श्रद्धांजली अर्पण केली. यानंतर अनिल देशपांडे यांनी कै मुंगी यांची माहिती सांगितली.नंतर संघजन प्रतिष्ठानच्यावतीने देवदत्त जोशी, पुणे केंद्राचे प्रमुख मकरंद माणकीकर, देशस्थ ऋग्वेदी संस्थेचे अध्यक्ष मुकुंदराव कुलकर्णी, वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, अमित घुगे भाजपा सचिव, धनंजय बेळे निमाचे अध्यक्ष, रमेश देशमुख -अध्यक्ष संस्कृत सभा, वसंत खैरनार संचालक ज्योती स्टोअर्स, प्रकाश दिक्षीत नववर्ष स्वागत समिती, सावानाचे कार्याध्यक्ष ॲड अभिजित बगदे, सुहासिनी बुरकुले, प्राचार्य रमेश जोशी, ॲड. के.जी कुलकर्णी, चंद्रशेखर गायधनी, उदयकुमार मुंगी यांचा मुलगा डॉ आशुतोष मुंगी, किशोर देशपांडे, रवी देव, यांनी श्रद्धांजली अर्पण केली. समारोप अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे अध्यक्ष ॲड.अविनाश भिडे यांनी केले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष प्रशांत जाधव, श्रीपाद कुलकर्णी, अभय छल्लाणी, सावानाचे वैद्य विक्रांत जाधव, संजय करंजकर, गिरीश नातू, मंगेश मालपाठक, जयप्रकाश जातेगावकर, जयेश बर्वे, धर्माजी बोडके, सौ.प्रेरणा बेळे तसेच बाळासाहेब कुलकर्णी, अजित कुलकर्णी, उल्हास पंचाक्षरी, प्रविण कुलकर्णी, सुहास शुक्ल, ॲड.समीर जोशी, सुहास भणगे, विश्वास पारनेरकर यांच्यासह उदयकुमार मुंगी यांचा संपूर्ण परीवार उपस्थित होता.


सामुदायिक अथर्वशीर्ष पठणातून केली गणेशाची आराधना

नाशिक : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था आणि समाज सहायक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सवानिमित्त सामुदायिक अथर्वशीर्ष पठण सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या अभ्यंकर सभागृहात रविवारी (दि.१५) करण्यात आले होते. सामुदायिक अथर्वशीर्ष पठणातून गणेशाची आराधना करण्यात आली. हेमलता अमृतकर, उज्ज्वला वाणी, जयश्री मेणे, शैलजा वाणी, स्वाती मेतकर यांनी एकसुरात अथर्वशीर्षाचे पठण केले. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष उदयकुमार मुंगी, अनिल देशपांडे, उल्हास पंचाक्षरी, गंगाधर कुलकर्णी, सुहास भणगे, अ‍ॅड. समीर जोशी, चंद्रशेखर जोशी, विश्वास पारनेरकर, सुनील भणगे आदी मान्यवर उपस्थित होते सत्यविनायक पूजन सुहास भणगे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर महाआरती होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.


तुम्हाला आवडेल आणि निवडू शकेल अशी सर्वोत्तम विवाह भेट.


तुम्हाला आवडेल आणि निवडू शकेल अशी सर्वोत्तम विवाह भेट.


तुम्हाला आवडेल आणि निवडू शकेल अशी सर्वोत्तम विवाह भेट.


वधु-वर मेळावे ही काळाची गरज : ॲड. भिडे


अवडंबर न करता अध्यात्माकडे शास्त्र म्हणून पहावे


अध्यात्माकडे शास्त्र म्हणून बघावे


इतिहास संशोधक मोहन शेटे यांचे उद्या व्याख्यान


अध्यात्माकडे शास्त्र म्हणून बघा : कुलकर्णी


आपल्या चिरस्थायी प्रवासाला सुरुवात करा
प्रेम आणि आयुष्यभराची साथ

आजच आमच्या विघ्नहर्ता विवाह सहाय्यामध्ये लॉग इन करा, जिथे अर्थपूर्ण जोडण्यांमुळे लग्नाचा सुंदर प्रवास होतो.

विघ्नहर्ता मॅट्रिमोनीसह लॉगिन करा