अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था ही समस्त ब्राह्मण समाज संघटीत करण्याकरीता निर्माण झालेली एक शक्ती आहे. सर्वशाखीय ब्राह्मण समाजाने एका व्यासपीठावर यावे,आचार, विचार, रुढी, कुलाचार, व्रतवैकल्ये यामध्ये कालानुरुप बदल करुन विज्ञाननिष्ठ पायावर ब्राह्मण समाजाच्या सर्वांगीण प्रगती करीता प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे. संघटीत ब्राह्मण हाच पाया आहे. तसेच या वाटचालीत आपण हिंदु समाजाचे बांधव आहोत हा विचार प्रामुख्याने पुढे ठेवला पाहिजे आणि याच हेतुने १९७२ साली समस्त ब्राह्मण समाज संघटीत करण्याच्या उद्दात्त हेतुने या संस्थेची स्थापना झालेली आहे.

संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय नाशिक, महाराष्ट्र येथे असुन नाशिक, पंचवटी (नाशिक),पुणे, जुन्नर, फलटण, नीरा, शिरवळ, लोणंद, करमाळा येथे केंद्र (शाखा) आहेत. ब्राह्मण ज्ञाती बरोबरच इतर समाज बांधवांना एकत्र करुन किंवा त्यांच्या कार्याचा गौरव करुन संस्था एकसंधपणे गेली अनेक वर्षे यशस्वीपणे कार्य करीत आहे.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था ही गेल्या ५० वर्षापासुन समस्त ब्राह्मण समाजासाठी काम करीत असलेली संस्था आहे. जेष्ठ नाटककार मा. प्रभाकर पणशीकर-मुंबई, श्री.भालबा केळकर-मुंबई, श्री.नारायणराव नाईक-मुंबई, श्री.श्री.मो.मराठे-पुणे, श्री.चंद्रशेखर जोशी-जुन्नर, श्री.का.पु.वैशंपायन-नाशिक, डॉ.नि.ह.कुलकर्णी-नाशिक, अशा मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्षपद भुषविलेले असुन आज रोजी संस्थेचे अध्यक्ष म्हणून नाशिक येथील जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड अविनाश भिडे काम पहात आहेत.

संस्था स्थापन झाल्यापासुन वेगवेगळ्या कालखंडामध्ये कार्यरत असलेल्या विविध कार्यकर्त्यांनी अखंड परिश्रम घेऊन उभी केलेली ही संस्था आज ताठ मानेने उभी आहे. जागा मिळविण्यापासुन त्या जागेवर इमारत उभी रहावी यासाठी तन मन धनाने योगदान देऊन कार्यकर्त्यांनी निधी संकलन केले. नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य असे सभागृह उभे केले. त्या काळात केलेले हे कार्य उल्लेखनीय असेच आहे.

ब्राह्मण समाजाच्या विद्यार्थ्यांबरोबरच इतर समाजातील विद्यार्थ्यांनी नाशिक सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत असतांना राहण्याची सोय उपलब्ध करुन देणारी म्हणून या संस्थेची ख्याती आहे. ज्या काळात इतरत्र कोठेही अशा सोयी उपलब्ध होत नव्हत्या अशा काळात संस्थेने विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करुन दिली. जिल्हा व जिल्ह्या बाहेरील हजारो विद्यार्थ्यांनी आजपर्यंत याचा लाभ घेतला आहे. आजही असे विद्यार्थी संस्थेचे नाव अभिमानाने घेत असतात. त्याच बरोबर सामुदायीक व्रतबंधासारखे उपक्रम राबवीले जातात. संस्थेच्या आवारात श्री विघ्नहर्ता गणेशाचे अतिशय सुबक मंदिर बांधण्यात आलेले आहे. या मंदिरात श्रींची पंचधातुची सुंदर मुर्ती आहे. दर संकष्टी चतुर्थीला अथर्वशीर्षाची आवर्तने होतात व महाप्रसाद होत असतो. सर्व सभासद सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमाचा लाभ घेतात. गणेश जयंतीला गणेश यागाचे आयोजन करण्यात येते व या साठी नाशिक मधील गणेश भक्त मोठ्याप्रमाणावर दर्शनासाठी येत असतात.

संस्थेची विविध केंद्रे कार्यरत आहेत. जुन्नर केंद्राची स्वत:ची वास्तु उभी आहे. पुणे केंद्र एक सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका चालवित आहे.

नाशिक केंद्राच्या माध्यमातून उमेदीचे कार्यकर्ते काम करण्यास उत्सुक असुन नाशिक केंद्राने कार्यकर्त्यांचे एक मोठे जाळे निर्माण केले आहे. नाशिक केंद्रात काम करणारे आजही शहरात विविध धार्मिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे अनुभवी कार्यकर्ते आहेत. ‘सन्मार्गमित्र’ या नावाचे संस्थेचे मुखपत्र गेले अनेक वर्षांपासून चालविले जात आहे.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेशी देशस्थ ऋग्वेदी संस्था, शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण संस्था,चित्त्पावन ब्राह्मण संस्था या व यासारख्या ब्राह्मण ज्ञातीतील अनेक संस्था संलग्न आहेत.तसेच महाराष्ट्रातील इतरही अनेक ब्राह्मण संस्था संलग्न आहेत.

संस्थेच्या वतीने दरवर्षी ब्राह्मण समाज संघटीत होण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम यशस्वीरित्या राबविले जातात. संस्थेचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षी मोठ्या थाटात साजरा केला जातो. वर्धापनदिन सोहळ्याचे औचित्य साधुन संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा समाजगौरव हा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती, माजी मुख्यमंत्री मा.मनोहर जोशी, जेष्ठ विचारवंत व अभ्यासक मा.श्री प्रकाशजी पाठक या सारख्या अनेक मान्यवरांनी संस्थेला भेट देवून संस्थेच्या कामाचे कौतुक केले आहे. २०२१-२२ हे वर्ष संस्थेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. सुवर्णमहोत्सवाचे सांगता समारंभाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ५१ व्यक्तींचा सन्मान करण्याचा मानस आहे.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक.

Image not found
Image not found

कार्यक्रम

कार्यकारी समिती संघ (२०२२-२०२५)

उत्तम विवाह म्हणजे 'परिपूर्ण जोडपे' एकत्र आल्यावर नाही. जेव्हा एक अपरिपूर्ण जोडपे त्यांच्यातील मतभेदांचा आनंद घेण्यास शिकते.

सन्मार्गमित्र

https://monvalleyvistas.com/ https://simwas.inspektorat.lumajangkab.go.id/records/ https://esptpd.purworejokab.go.id/vendor/produk/deposit/pulsa/tanpa/potongan/ https://esptpd.purworejokab.go.id/vendor/produk/slot/pulsa/5000/ https://esptpd.purworejokab.go.id/vendor/produk/slot/gacor/hari/ini/

आपल्या चिरस्थायी प्रवासाला सुरुवात करा
प्रेम आणि आयुष्यभराची साथ

आजच आमच्या विघ्नहर्ता विवाह सहाय्यामध्ये लॉग इन करा, जिथे अर्थपूर्ण जोडण्यांमुळे लग्नाचा सुंदर प्रवास होतो.

विघ्नहर्ता मॅट्रिमोनीसह लॉगिन करा